जाणून आहे अंतरी .
लागेल जन्मावे पुन्हा,
नेण्या तुला माझ्या घरी .
तू झुंजू-मुंजू हासशी,
जाई जुइचे बोलशी.
मी वेंधळा मग सांडतो,
थोड़ा चहा बाहिवरी.
तू बोलता साधे सुधे,
सुचवून जाशी केवढे.
मी बोलतो वाचाळ सा,
अन पंडीती काहीतरी.
होशी फुलासह फूल तू,
अन चांदण्या सह चांदणे.
ते पाहणे, इतकेच मी,
बघ मानले माझ्या करी.
म्हणतेस तू मज आवडे
हा रांगडा सीधेपणा.
विश्वास मी ठेवू कसा?
ह्या हुन्नरी शब्दावरी.
लिहिती बटा भालावरी
उर्दू लिपीतील अक्षरे.
हा जन्म माझा संपला
ती वाचताना शायरी
लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी...