**********************************************
मुसळधार पाउस खिडकीत उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का
हात लांबव, तळ हातावर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळ पिऊन टाक बघ... बघ माझी आठवण येते का
वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहीच जाणवलं काही, तर बाहेर पड
समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच
पाण्यात पाय बुडवून उभी राहा
वाळू सरकेल पाया खालून
बघ माझी आठवण येते का
मग चालू लाग
पावसाच्या अगणित सुया टोचून घे
शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस
केस पुसू नकोस
पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवऱ्याची वाट बघ
बघ माझी आठवण येते का
समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच
पाण्यात पाय बुडवून उभी राहा
वाळू सरकेल पाया खालून
बघ माझी आठवण येते का
मग चालू लाग
पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाउस थांबे पर्यंत
तो थांबणार नाहीच शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस
केस पुसू नकोस
पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवऱ्याची वाट बघ
बघ माझी आठवण येते का
दारावर बेल वाजेल
दार उघड
नवरा असेल
त्याच्या हातातील बाग घे
तो रेन कोट स्वत:च काढेल तो तुला विचारील तुझ्या भिजण्याच कारण
तू म्हण " घर गळतय"
मग चहा कर
तुही घे
तो उठून पंकज उदास लावील
तू तो बंद कर
किशोरीचा " सहेलारे " लाव
बघ माझी आठवण येते का
मग रात्र होईल
तो तुला कुशीत घेईल
तो म्हणेल " तू मला आवडतेस "
पण तू हि तसच म्हण
विजांचा कडकडाट होईल
ढगांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल
त्याच्या पाठमोऱ्या शरीरा कडे बघ
बघ माझी आठवण येते का
त्या नंतर सताड डोळ्यांनी छप्पर बघायला विसरू नकोस
या नंतर बाहेरचा पाउस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
या नंतर उशी खाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ.. बघ माझी आठवण येते का .
**********************************************
**********************************************
No comments:
Post a Comment